Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा; प्राचार्य यशवंत भोसले यांचे आवाहन

वडवणी : आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहून चालणार नाही. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक आण

केज-बीड राज्यमहामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सला कंटेनरची जोराची धडक, एचपीएम कंपनीच्या गतिरोधकांमुळे मोठा अनर्थ टळला तरी प्रवासी जखमी
बीडच्या नितीन सोनवणे यांना शेगाव येथे राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर
आयएएस तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची धास्ती? बीडमधील अनेक नामांकित हॉटेल्सचे शटर बंद

वडवणी : आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहून चालणार नाही. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा स्वीकार करावा. ‘शिकून कुठे नोकरी मिळते?’ हा नकारात्मक सूर बदलण्यासाठीच नालंदा फाउंडेशनने विद्यार्थ्यांची नेमकी नाळ ओळखून आधुनिक ‘ब्रेन ओरिएंटेड’ कोर्सेस आणले आहेत, असे परखड मत डॉ. सोनाजीराव रांजवन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य यशवंत भोसले यांनी व्यक्त केले.

नालंदा फाउंडेशन (बीड) यांच्या वतीने वडवणी येथील हिंगलाज माता मंदिर परिसरात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या शोभाताई आंधळे, प्रा. ओमप्रकाश जाधव, प्रा. अर्जुन राठोड, प्राचार्य भारत मगर, प्रा. विजयकुमार बोचरे, प्राचार्य संतोष मुंडे आदी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राचार्या शोभाताई आंधळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना योग्य दिशा आणि मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. प्रदीप रोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, बीड जिल्ह्याची ओळख कर्तृत्व, गुणवत्ता आणि यशाने निर्माण व्हावी, असे आवाहन केले. या सोहळ्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रेरणादायी पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डी. डी. राऊत व प्राचार्य प्रकाश ढोकणे यांनी केले तर तुलसी समूहातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS