Homeताज्या बातम्या

वसुली विभाग पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केल्याबद्दल मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचे आभार

रमेश गंगाधरे, एस.एम. युसूफ यांची माहिती बीड : बीड नगर परिषदेच्या वसुली विभागाचे स्थलांतर करण्याची मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी शैलेश फडसे यां

बीड बस स्थानकावरील महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांची रंगेहात धडक कारवाई, दोन महिला अटकेत
आयएएस तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची धास्ती? बीडमधील अनेक नामांकित हॉटेल्सचे शटर बंद
बीड तहसील कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची स्थापना; मोफत आरोग्य तपासणी शिबिरासही मोठा प्रतिसाद

रमेश गंगाधरे, एस.एम. युसूफ यांची माहिती

बीड : बीड नगर परिषदेच्या वसुली विभागाचे स्थलांतर करण्याची मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी तातडीने दखल घेत वसुली विभाग तिसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केला आहे. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेश गंगाधरे आणि मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ यांनी मुख्याधिकारी फडसे यांना आभारपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

नागरिकांना कर भरण्यासाठी तसेच विविध कामांसाठी नगर परिषदेत येताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन वसुली विभाग सहज उपलब्ध होईल अशा पहिल्या मजल्यावर असावा, अशी मागणी करण्यात आली होती. या आभारपत्रासोबतच त्यांनी बीड नगर परिषद इमारतीच्या दर्शनी भागात वसुली विभागाबाबत स्पष्ट सूचनाफलक लावावा, तसेच विभागाच्या दालनाबाहेरील भिंतीवर ठळक अक्षरात नाव लिहावे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही केली आहे.

या सूचनेचीही मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले की, नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील दर्शनी भागात मोठा सूचनाफलक लावण्यात येणार आहे. तसेच वसुली विभागाच्या दारावरील भिंतीवर मोठ्या अक्षरात विभागाचे नाव लिहिले जाईल. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी वसुली विभागातील प्रत्येक काउंटरसमोर कोणत्या प्रभागातील (वॉर्ड) नागरिकांनी कर भरावा, याची सविस्तर माहिती काचेवर नमूद करण्यात येणार आहे, जेणेकरून करदात्यांचा वेळ वाचेल.

COMMENTS