नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सक्षम आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी मैदानात न उतरल

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सक्षम आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी मैदानात न उतरल्याने संपूर्ण निवडणूक जवळपास एकतर्फी झाल्याचे चित्र आहे. यामुळे मतदार असलेल्या नगरसेवकांच्या मतांना जे अपेक्षित राजकीय महत्त्व आणि आर्थिक-राजकीय ‘भाव’ मिळायला हवा होता, तो न मिळाल्याची खंत अनेक नगरसेवकांकडून खासगीत व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांनी एकत्रित रणनीती आखून प्रभावी उमेदवार उभा केला असता, तर निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली असती. मात्र विरोधकांची मोट बांधण्यात आलेले अपयश आणि समन्वयाच्या अभावामुळे सत्ताधारी भाजपसमोर कोणतेही मोठे आव्हान उभे राहिले नाही. परिणामी, भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजयाचा मार्ग सुरुवातीपासूनच सुकर झाल्याची चर्चा रंगत आहे.
निवडणुकीत चुरस नसल्याने नगरसेवकांमध्येही उत्साह दिसत नाही. त्यातच विरोधी पक्षांतील काही नगरसेवक फुटल्याच्या आणि काही जण ‘सहली’वर गेल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. महा can आघाडीतील घटक पक्षांच्या या संघटनात्मक कमकुवतपणाचा थेट फायदा भाजपला मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना या एकतर्फी लढतीवरून मोठे आत्मपरीक्षण करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS