Homeताज्या बातम्याबीड

मातीशी नाळ जपणारा अधिकारी : जरूडमध्ये तहसीलदार शेळके यांचा शेतशिवार व शाळेला थेट भेट

बीड : प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीपुरते मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले, तरच त्याला खर्‍या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
कांदा विकूनही शेतकरी झाला कर्जबाजारी; १ टन कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!


बीड : प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीपुरते मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले, तरच त्याला खर्‍या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त होते, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मौजे जरूड येथे आज दिवसभर शाळा आणि शेतशिवाराचा प्रत्यक्ष आढावा घेत ग्रामीण जीवनाशी थेट संवाद साधला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद, नवीन पुस्तके, गणवेश आणि नव्या स्वप्नांची चाहूल यामध्ये सहभागी होत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील सक्षम नागरिक असून शिक्षणातूनच समाजपरिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला. प्रारंभीच्या हलक्या पावसावर अवलंबून राहिल्यास पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, त्यामुळे समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी स्वतः शेतात उतरून औत हाती घेत पाळीचे काही कामही केले. अधिकारी प्रत्यक्ष शेतात उतरल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी यापूर्वीच वैज्ञानिक शेती, जलसंधारण आणि जोखीम व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार शेळके यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रसंगी सरपंच श्रीराम काकडे, उपसरपंच पंजाब काकडे, ज्येष्ठ शेतकरी भगवान काकडे, कल्याण काकडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी विविध समस्या मांडून प्रशासनाशी सकारात्मक चर्चा केली. शिक्षण आणि शेती या दोन्ही क्षेत्रांशी प्रशासनाने जपलेली ही जवळीक लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत असून, गाव, शाळा आणि शेत यांना जोडणारी ही भेट जरूड परिसरात दिवसभर चर्चेचा विषय ठरली.

COMMENTS