Homeताज्या बातम्याबीड

बीड जिल्ह्याला राज्यस्तरीय सेपॅक टकरा स्पर्धेत दुहेरी रौप्यपदक; खेळाडूंच्या दमदार कामगिरीची दखल

बीड : नागपूर येथे दि. 4 ते 6 जून 2026 दरम्यान उत्साहात पार पडलेल्या 36 वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ सेपॅक टकरा चॅम्पियनशिप आणि 27 वी महाराष्ट्र राज

पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक
लक्ष्मीबाई राजळे यांचे निधन
बीड जिल्हा शिवसेनेला मिळाला तरुण तडफदार चेहरा!इरफान कुरेशी यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी जिल्हाप्रमुखपदी निवड


बीड : नागपूर येथे दि. 4 ते 6 जून 2026 दरम्यान उत्साहात पार पडलेल्या 36 वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ सेपॅक टकरा चॅम्पियनशिप आणि 27 वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर सेपॅक टकरा चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बीड जिल्हा संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दुहेरी रौप्यपदकाची कमाई केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील बलाढ्य संघांच्या सहभागामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
या स्पर्धांमध्ये वरिष्ठ आणि ज्युनिअर दोन्ही गटांत बीड जिल्ह्याने सातत्यपूर्ण उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. वरिष्ठ गटातील क्वाड इव्हेंट प्रकारात बीडच्या संघाने सांघिक समन्वय, जलद प्रतिसाद क्षमता आणि अचूक तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. वरिष्ठ गटातील बीड संघात राजेश पाटील, मिर्झा झीशान बेग, शेख शोएब, असलम खान, शेख फरजान आणि मोहम्मद अजीज यांनी अत्यंत शिस्तबद्ध व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत संघाला राज्यस्तरावर दुसरे स्थान मिळवून दिले. अंतिम सामन्यातही बीड संघाने जोरदार प्रतिकार करत सामना चुरशीचा केला. तसेच ज्युनिअर गटातील 27 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत बीडच्या तरुण खेळाडूंनी देखील उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. प्रतीक सुकाळे, रेहान खान, शेख अदिब, काशिफ खान, शायझा चौधरी आणि शेख जैनुद्दीन यांनी उत्कृष्ट कौशल्य, चपळता आणि संघभावनेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेदरम्यान बीड संघाच्या खेळाडूंनी अनेक कठीण सामने जिंकत आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे दोन्ही गटांमध्ये बीड जिल्ह्याचा प्रवेश अंतिम फेरीपर्यंत राहिल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात समाधानाची आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. या यशाबद्दल बीड जिल्हा सेपॅक टकरा संघटनेचे अध्यक्ष ड. शेख शफिक भाऊ, सचिव परवेज खान, प्रशिक्षक असलम खान तसेच शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे डॉ. भीमा माने यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही याच जोमाने खेळ करून बीड जिल्ह्याने देशपातळीवर नावलौकिक मिळवावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. या दुहेरी यशामुळे बीड जिल्ह्यात सेपॅक टकरा खेळाला नवी चालना मिळाली असून, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठीही ही कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. आगामी काळात बीडचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटवतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

COMMENTS