Homeताज्या बातम्या

अभिजीत दीपके यांच्यावर दोन तरुणांनी लगावली थापड; जयपूरमधील आंदोलनात घडला प्रकार, दोन तरुण ताब्यात

जयपूर : जयपूर येथे शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना, वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या विविध प्रश्नांवर आयोजित आंदोलनादरम्यान

 महिलांसाठी शासनाच्या विविध स्वयंरोजगाच्या संधी 
महाराष्ट्र दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात
‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल’ : नाना पटोले | LOKNews24
Tension at Jaipur Protest: Party Leader Abhijeet Deepke Slapped Repeatedly,  Two Detained

जयपूर : जयपूर येथे शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना, वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या विविध प्रश्नांवर आयोजित आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर दोन तरुणांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जयपूरमधील हुतात्मा स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक, विद्यार्थी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणाबाजी करण्यात येत होती. आंदोलनस्थळी दीपके यांचे आगमन झाल्यानंतर समर्थक त्यांना खांद्यावर घेऊन पुढे जात असताना गर्दीतून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या प्रकारानंतर उपस्थित कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी संबंधित तरुणांना पकडून मारहाण केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजीवरून काही युवकांमध्ये वाद झाल्याने किरकोळ धक्काबुक्कीही झाली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला सुरक्षा पथक, राखीव पोलीस दल तसेच स्थानिक पोलिसांचे जवान घटनास्थळी उपस्थित होते. आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी राष्ट्रध्वज, संविधानाची प्रत, पुस्तके आणि विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. “प्रश्नपत्रिका फुटी थांबवा, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करा”, अशा मागण्या आंदोलकांनी मांडल्या. अनेक महिला आपल्या लहान मुलांसह या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनस्थळी काही सहभागींचे भ्रमणध्वनी (मोबाईल) हरवल्याच्या तक्रारीही समोर आल्या; त्यानंतर आयोजकांनी उपस्थितांना आपल्या वैयक्तिक वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले.

पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, “हा संघर्ष कोणत्याही एका संघटनेचा नसून विद्यार्थी, युवक आणि पालकांच्या प्रश्नांशी संबंधित आहे. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवस्था, भरती प्रक्रियेतील अनियमितता, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना आणि वाढत्या बेरोजगारीविरोधात जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.” दरम्यान, हल्ला करणाऱ्या तरुणांपैकी एकाने माध्यमांशी बोलताना दीपके यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली. तथापि, या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.

COMMENTS