Homeताज्या बातम्या

मान्सूनची गती मंदावली; महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम, देशात ६४ टक्के तूट नोंदवली

मुंबई : देशभरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) प्रगती सध्या मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, १५ जून रोजीच्या

नांदेड जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ सायकल स्पर्धा उत्साहात; ८० महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर २३ व २४ जून रोजी दर्शनासाठी पूर्णपणे बंद; मूर्ती संवर्धनासाठी केली जाणार विशेष लेपन प्रक्रिया
अंजनापूर ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार; कोपरगाव येथील ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची ग्वाही
शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची  शक्यता कमी - Lokmanthan | लोकमंथन

मुंबई : देशभरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) प्रगती सध्या मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, १५ जून रोजीच्या उपग्रह छायाचित्रांमध्ये देशाच्या बहुतांश भागावर मान्सूनचे ढग विरळ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अपेक्षित पावसासाठीची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ जून ते १५ जून या कालावधीत देशात सरासरी ५३.७ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात केवळ १९.२ मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी, या कालावधीत पावसामध्ये तब्बल ६४ टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण भारतातून पुढे सरकल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या परिसरात काही काळ रेंगाळली किंवा स्थिरावली आहे. दुसरीकडे, ईशान्य भारतातील टप्पा पार केल्यानंतर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या दिशेनेही मान्सूनची गती कमी झाली आहे. त्यामुळे या भागांमध्ये मान्सूनचे पूर्ण आगमन अद्याप झालेले नाही. राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या. राजस्थानमधील जयपूरमध्ये वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर चित्तौडगड परिसरात पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य प्रदेशातील पाचमढी येथे अल्पकालीन पाऊस झाला असून बिहारमधील नालंदा येथे उकाड्यानंतर जोरदार पावसाची नोंद झाली. आज १६ जून रोजी बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बिहारच्या काही भागांत ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश तसेच तामिळनाडू, पुडुचेरी आणि कर्नाटकातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

उद्या १७ जून रोजी सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कर्नाटकातील काही भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेचा प्रभाव कायम मान्सूनच्या प्रगतीतील मंदीमुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अद्याप कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात १७ जूनपर्यंत तर विदर्भात १६ जूनपर्यंत उष्णतेची लाट जाणवू शकते. कोकण आणि गोवा परिसरातही उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही भागांत रात्रीच्या वेळी देखील उकाडा जाणवू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१९ जूनपर्यंत उत्तर भारतात पावसाची शक्यता पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान प्रणालीमुळे उत्तर-पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये १९ जूनपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या डोंगराळ राज्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात अधूनमधून पाऊस होण्याचा अंदाज आहे.

COMMENTS