Homeताज्या बातम्या

जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बाभुळगाव फाट्यावर बैठक; वाढीव संपादनाचे पोल उपटून फेकले, १८ जूनला रास्ता रोकोचा इशारा

नांदेड : जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी १४ जून २०२६ रोजी बाभुळगाव फाटा (ता. नांदेड) येथे महत्

नांदेडकरांवर ‘स्मार्ट मीटर’चा दबाव? अखंड वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरलेल्या महावितरणची नवी मोहीम
लोक अदालतीत महापालिकेची 1.46 कोटींची मालमत्ता कर वसुली
प्राचार्य हेमंत इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

नांदेड : जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी १४ जून २०२६ रोजी बाभुळगाव फाटा (ता. नांदेड) येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस तुप्पा, काकांडी, बाभुळगाव, गुंडेगाव, पांगरी आणि विष्णूपुरी येथील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने अनधिकृतपणे शेतात वाढीव संपादनासाठी रोवलेले सिमेंटचे पोल संतप्त शेतकऱ्यांनी उखडून फेकून दिले.

या बैठकीत समृद्धी महामार्गाच्या सर्विस रोड आणि इंटरचेंजच्या नावाखाली इतर कामांसाठी केल्या जाणाऱ्या अतिरिक्त जमीन संपादनास तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत जुन्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत जमीन संपादन करू न देण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून गुरुवारी, १८ जून २०२६ रोजी तुप्पा येथे नांदेड-हैदराबाद महामार्गावर भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

या बैठकीत मुख्य समन्वयक दासराव हंबर्डे यांच्यासह परदेशी बाबूजी, शिवाजी कदम, अशोक मोरे, माजिद शेठ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी संभाजी भालेराव, रामदास कदम, गजानन कदम, नवाब, संतोष भालेराव कांचनगिरे, संतोष मस्के, ठाकूर पांगरेकर, साहेबराव कुरे, अमोल कदम, मुंजाजी काकांडीकर, चंद्रकांत काकांडीकर, ज्ञानेश्वर वडजे, विठ्ठल हंबर्डे, सुरेश भालेराव, शिवार भालेराव यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS