Homeताज्या बातम्या

३३ वर्षांच्या अविरत जनसेवेला मानाचा मुजरा! किनवटचे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अशोक बेलखोडे यांना ‘समाजसेवा पुरस्कार २०२६’ प्रदान

किनवट : आदिवासी, गोर-बंजारा बहुल आणि दुर्गम डोंगराळ किनवट परिसरात गेल्या ३३ वर्षांपासून अविरत वैद्यकीय व सामाजिक सेवा देणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्

किनवटमध्ये अजब प्रकार; भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत रातोरात भुईसपाट, कोट्यवधींचा शासकीय भूखंड हडप करण्याचा डाव?
अवैध स्विमिंग पूल ठरला जीवघेणा; इस्लापुरात १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, एकाला अटक
’स्टे’ आणला म्हणजे पाप धुतलं जात नाही; किनवट बाजार समितीत जमीन विक्री अन् कोट्यवधींच्या घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक!

किनवट : आदिवासी, गोर-बंजारा बहुल आणि दुर्गम डोंगराळ किनवट परिसरात गेल्या ३३ वर्षांपासून अविरत वैद्यकीय व सामाजिक सेवा देणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना प्रतिष्ठेचा ‘समाजसेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. प्रकाश आनंद प्रतिष्ठान पुरस्कृत आणि आनंदवन मित्र मंडळ (मुंबई) यांच्यातर्फे हा सोहळा शनिवारी (दि. १३ जून २०२६) साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कोठारी (ता. किनवट) येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला.

स्व. कमलाकर ठाणेकर यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री यांच्या हस्ते डॉ. बेलखोडे यांचा गौरव करण्यात आला. २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ किनवट परिसरातील दुर्गम भागांतील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना डॉ. बेलखोडे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे.

या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) अध्यक्ष माधव बावगे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील व्यवहारे यांनी केले. याप्रसंगी मुंबईहून आलेले विशेष अतिथी नरेंद्र मेस्त्री, शालन मेस्त्री, सिदराम बंडगर, बबन निकाळजे यांच्यासह भारत जोडो युवा अकादमी, साने गुरुजी रुग्णालय परिवार, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शेकडो नागरिक डॉ. बेलखोडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS