Homeताज्या बातम्या

राहुरीचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांना भावपूर्ण निरोप; सेवागौरव सोहळा उत्साहात संपन्न

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा भव्य सत्कार व निरोप समारं

राहुरीत रहस्यमय ड्रोनचे गूढ अधिक गडद; अँटी-ड्रोन पथकाची कारवाई निष्फळ, आकाशात १० ड्रोन दिसल्याचा दावा
 विटंबना प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस
राहुरीत ‘मिशन अँटी ड्रोन’ सुरूच; संशयास्पद ड्रोनची संख्या घटली, मात्र गूढ कायम

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा भव्य सत्कार व निरोप समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीचे गटविकास अधिकारी (BDO) डॉ. सुरेश तायडे होते.

या निरोप समारंभाला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी नंदा गवळी, इंदुमती देवरे, केंद्रप्रमुख विद्या भागवत, योगेश देशमुख, विठ्ठल वराळे, विठ्ठल काकडे आणि अनिल विधाते यांच्यासह अनेक शिक्षक व पंचायत समितीतील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. अनिल विधाते यांनी तुंबारे यांच्या प्रदीर्घ सेवाप्रवासाचा परिचय करून दिला. १ जून १९६८ रोजी कोपरगाव येथे जन्मलेल्या तुंबारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी विज्ञान आणि शारीरिक शिक्षण (B.P.Ed.) शाखेची पदवी संपादन केली. ९ जुलै १९९३ रोजी सासवणे (अलिबाग) येथील शासकीय अध्यापक विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात केली होती.

त्यानंतर त्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्राध्यापक, प्रशासन अधिकारी आणि विज्ञान पर्यवेक्षक या पदांवर उल्लेखनीय काम केले. कोपरगाव, राहुरी व संगमनेर येथील विविध संस्थांमध्ये तसेच डाएट (DIET) संगमनेर येथे त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०२२ मध्ये वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केल्यानंतर ३ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांची राहुरी पंचायत समितीत नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि अभ्यासू दृष्टिकोनाचा सर्व वक्त्यांनी गौरव केला. यावेळी डॉ. सुरेश तायडे, संजय ठेंगे, डॉ. दिपाली गायकवाड यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

COMMENTS