Homeताज्या बातम्या

किनवट तालुक्यातील दाभाडी येथील सिमेंट बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची ८ दिवसांत चौकशी करा; सरपंच अनिल डुडुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी

किनवट : तालुक्यातील मौजे दाभाडी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना सन २०२४-२५) अंतर्गत मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या सि

किनवट-माहूरच्या वीज समस्यांवर आमदार भीमराव केराम आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती, १०० गावांत नवीन खांब बसवण्याचे कडक निर्देश
किनवटमध्ये अजब प्रकार; भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत रातोरात भुईसपाट, कोट्यवधींचा शासकीय भूखंड हडप करण्याचा डाव?
किनवट तहसीलदारांचे ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकरण तापले! लाचलुचपत व बेकायदेशीर रेती उपशाप्रकरणी २९ मे रोजी सुनावणी
ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

किनवट : तालुक्यातील मौजे दाभाडी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना सन २०२४-२५) अंतर्गत मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, यात मोठा आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप दाभाडीचे सरपंच अनिल शामराव डुडुळे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची ८ दिवसांच्या आत गुणवत्ता नियंत्रण कक्षातर्फे (Quality Control) सखोल चौकशी करून दोषी अभियंता आणि कंत्राटदारावर दंडात्मक व निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) एका निवेदनाद्वारे केली आहे.

सरपंचांनी दिलेल्या निवेदनानुसार, दाभाडी ग्रामपंचायतीने २८ जानेवारी २०२५ रोजीच्या मासिक सभेत लघु पाटबंधारे विभागांतर्गत सिमेंट बंधाऱ्याच्या कामासाठी जागा निश्चित करून मंजुरीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, कामाला मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटदाराने लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याशी संगनमत करून, मंजूर ठिकाणी काम न करता एका छोट्याशा नाल्यावर अत्यंत निकृष्ट व घाईघाईने काम उरकले. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हा नवीन सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे, त्याच्या अवघ्या १०० मीटर अंतरावर पूर्वीपासूनच एक बंधारा अस्तित्वात आहे. यामुळे शासनाच्या २० लाख रुपयांचा नाहक अपव्यय झाला आहे.

या बंधाऱ्याचे काम सुरू असताना लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कोणतीही पाहणी केली नाही. अंदाजपत्रकाप्रमाणे कामाचे मूल्यांकन न करता, केवळ आर्थिक फायद्यासाठी बसल्या जागीच खोट्या मोजमाप पुस्तिका तयार करण्यात आल्या. निकृष्ट साहित्य वापरून तयार केलेल्या या कामाचे देयक अदा करण्यास मंजुरी देऊन शासनाची आणि जनतेची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. बंधाऱ्याची लांबी, रुंदी आणि खोली अंदाजपत्रकापेक्षा अत्यंत कमी असून, सिमेंटचे प्रमाणही नगण्य वापरले गेल्याने हा बंधारा काही दिवसांतच कोसळण्याची भीती आहे. या प्रकरणाची ८ दिवसांत सखोल चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा सरपंच अनिल डुडुळे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी (नांदेड) आणि प्रकल्प अधिकारी (किनवट) यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

COMMENTS