बीड : मागासवर्गीय समाजातील घटकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास

बीड : मागासवर्गीय समाजातील घटकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे सन 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत विशेष घटक योजना आणि बीजभांडवल योजना या दोन महत्त्वाच्या योजनांसाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र हिंदू खाटीक समाजातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या वर्षी दोन्ही योजनांसाठी प्रत्येकी केवळ 3 लाभार्थ्यांचे मर्यादित उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुकांनी अर्ज पूर्ण भरून, त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडून जिल्हा कार्यालयात स्वतः उपस्थित राहून मूळ प्रत सादर करावी. कोणत्याही त्रयस्त व्यक्तीमार्फत अर्ज किंवा वैधानिक दस्तऐवज स्वीकारले जाणार नाहीत. तरी योजनांची सविस्तर माहिती आणि अर्जासाठी लाभार्थ्यांनी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, बीड संपर्क क्र. 02442-222614 येथे संपर्क साधावा. असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS