Homeताज्या बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई; ‘गर्भलिंग निदान’ प्रकरणी आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर, ७ डॉक्टरांचा समावेश

अहिल्यानगर : लोणी येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात नवनवे धागेदोरे समोर येत असून पोलिसांनी आणखी दोघ

शेवगाव दूध भेसळ प्रकरणातील तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाकडून दखल; अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या चौकशीचे निर्देश
शिर्डी-नाशिक महामार्गावर बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १५ जखमी
दुरगाव येथे महिलेस मारहाण
छत्रपती संभाजीनगर : 19 वर्षांची पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी करत होती गर्भलिंग  निदान, काय आहे प्रकरण? - BBC News मराठी

अहिल्यानगर : लोणी येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात नवनवे धागेदोरे समोर येत असून पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे अटक आरोपींची संख्या आता २१ वर पोहोचली असून, यामध्ये तब्बल सात डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात सुरुवातीला नेवासातील एका डॉक्टरसह नऊ जणांना अटक करून एक सोनोग्राफी यंत्र आणि तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी श्रीरामपूर येथील दोन डॉक्टर, पुणे येथील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य विक्रीशी संबंधित एका व्यक्तीला अटक केली. तसेच वडगाव मावळ व नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील डॉक्टरांकडून बेकायदेशीर सोनोग्राफी यंत्रे जप्त करण्यात आली.

पुढील तपासात घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथील औषध विक्रेता जालिंदर बोरुडे आणि मध्यस्थ म्हणून काम करणारा मलठण (ता. कर्जत) येथील राम पवार उर्फ तपोश सरकार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. राम पवार याच्याकडून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय पुण्यातून आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली असून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आतापर्यंत ५ सोनोग्राफी यंत्रे, ४ चारचाकी वाहने आणि १ दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

COMMENTS