Homeताज्या बातम्या

तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बरखास्त

कर्जत : तालुक्यातील तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून संस्थेचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी अहमदनगर

कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
हजारो शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहण्याची भीतीमे-जूनचे रेशन एकाचवेळी वितरित करण्याचे आव्हान; अनेक दुकानांत अद्याप धान्यच नाही  
कायद्यांचे उल्लघंन करणा-या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालकांनवर अपात्रतेची कार्यवाही - तरुण गर्जना वृत्तपत्र


कर्जत : तालुक्यातील तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून संस्थेचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माहीजळगाव शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र रामराव सोले यांची प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर तरडगाव ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र सोले व संस्था सचिव भरत पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शरद देवकाते, माजी सरपंच वैजीनाथ केसकर, बापूराव नामदेव देवमुंडे, वसंत केसकर, संदीप केसकर, ज्ञानेश्वर केसकर, संस्था लिपिक भागवत हळनवर तसेच बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे १३ सदस्यीय संचालक मंडळ होते. त्यापैकी दोन संचालकांना सहाय्यक निबंधक, कर्जत यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे संस्थेकडे ११ संचालक उरले होते. या संचालकांमध्ये दोन राजकीय गट निर्माण झाले होते.
 शेतकरी सभासदांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन संत सद्गुरू बाळूमामा गटाचे संचालक बाळासाहेब सिद्धू देवमुंडे, लक्ष्मण वामन केसकर, सखाराम अंकुश केसकर, बाळासाहेब मच्छिंद्र देवकाते आणि अर्जुन भानुदास देवमुंडे यांनी आपल्या संचालक पदाचे राजीनामे संस्था सचिवांकडे सादर केले. यानंतर संस्था सचिव भरत पवार यांनी तीन मासिक बैठकींना सात संचालक गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण न झाल्याचा अहवाल तसेच पाच संचालकांच्या राजीनाम्यांचा अहवाल सहाय्यक निबंधक, कर्जत यांच्याकडे पाठविला. या अहवालाची दखल घेत संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.  

COMMENTS