कर्जत : "मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याची संधी नेत्रदानामुळे मिळते. दोन अंध व्यक्तींना नवजीवन देणारे नेत्रदान हे मानवतेच्

कर्जत : “मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याची संधी नेत्रदानामुळे मिळते. दोन अंध व्यक्तींना नवजीवन देणारे नेत्रदान हे मानवतेच्या दृष्टीने सर्वोच्च दान आहे,” असे प्रतिपादन डॉ. अमृता सावंत यांनी केले.
जागतिक नेत्रदान जनजागृती दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगाव संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी नेवसे व संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर नेवसे, सचिव राजेंद्र गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अमृता सावंत उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अमृता सावंत यांनी नेत्रदानाचे महत्त्व, त्याविषयीचे गैरसमज आणि जनजागृतीची आवश्यकता यावर सविस्तर भाष्य केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी विद्यार्थ्यांना समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “नेत्रदानामुळे अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः जागरूक राहून समाजात नेत्रदानाचा संदेश पोहोचवावा,” असे ते म्हणाले.
या प्रसंगी प्रा. बाळासाहेब पारखे, प्रा. तेजस गायकवाड, प्रा. मोहिनी शिंदे, प्रा. पूजा इनामके, प्रा. रोशनी इंगळे, प्रा. प्रियंका जाधव, प्रा. महेश कुतवळ व प्रा. सचिन आढाव यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तेजस गायकवाड यांनी केले, तर प्रा. महेश कुतवळ यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS