Homeताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री पोलिसांचे रेव्ह पार्टीवर छापेशंभरहून अधिक युवक-युवती ताब्यात घेतल्याने खळबळ

पुणे : पुणे जिल्ह्यातील तुळापूर परिसरात एका आलिशान बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या कथित अमली पदार्थ व मद्याच्या मेजवानीवर पोलिसांनी धाड टाकत मो

गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ’डीपीआर’ तयार करण्याचे शासनाचे पर्यावरण विभागाला आदेश; खा. डॉ.  गोपछडे यांच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ; ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण
कांदा विकूनही शेतकरी झाला कर्जबाजारी; १ टन कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!
Pune News : पुण्यात मध्यरात्री 'प्रोजेक्ट एक्स'चा धिंगाणा; कथित 'रेव्ह  पार्टी'वर पोलिसांचा छापा; ६० ते ७० तरुण-तरुणींची चौकशी - Dainik Prabhat


पुणे : पुणे जिल्ह्यातील तुळापूर परिसरात एका आलिशान बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या कथित अमली पदार्थ व मद्याच्या मेजवानीवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत शंभरहून अधिक युवक-युवतींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यात काही अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच गांजा जप्त करण्यात आला आहे.
पुणे शहर गुन्हे शाखेने ही कारवाई लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर गावात केली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित बंगल्यात मोठ्या प्रमाणावर युवक-युवती जमले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुपारी एक वाजल्यापासून रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी तात्पुरती परवानगी घेण्यात आली होती. मात्र, परवानगीची मुदत संपल्यानंतरही कार्यक्रम सुरू ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. धाडीदरम्यान अनेक जण मद्य आणि इतर मादक पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर सर्व उपस्थितांना ताब्यात घेऊन त्यांची ओळख, वय आणि पार्श्‍वभूमीची पडताळणी सुरू करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये लाखो रुपयांचा मद्यसाठा, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले की, परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाले आहे का, तसेच आयोजकांनी इतर कोणते नियम मोडले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. कार्यक्रमासाठी बंगला उपलब्ध करून देणार्‍या व्यक्तीची भूमिकाही तपासली जात आहे. संबंधित व्यक्तींचा या प्रकारात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ताब्यात घेतलेल्या युवक-युवतींपैकी काही जण 21 वर्षांखालील असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मद्यपुरवठा, प्रवेशव्यवस्था आणि आयोजकांची जबाबदारी या मुद्द्यांची स्वतंत्र चौकशी केली जात आहे. सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मेजवानीत सहभागी झालेले युवक-युवती पुणे शहरातील की इतर भागांतील आहेत, याचाही शोध सुरू आहे. लोणीकंद पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके या प्रकरणातील विविध पैलूंचा तपास करत असून, आयोजकांपासून पुरवठादारांपर्यंत संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुण्यातील रेव्ह पाटर्या पुन्हा चर्चेत
या कारवाईमुळे पुणे परिसरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर रात्रीच्या रेव्ह पाटर्या, अमली पदार्थांचा वापर आणि तरुणांमधील व्यसनाधीनतेच्या प्रश्‍नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या या धाडीनंतर अशा प्रकारच्या बेकायदेशीर उपक्रमांवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS