Homeताज्या बातम्या

तौहिद खान हत्याकांडामुळे परळीत संताप; व्हायरल ऑडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीअल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन

बीड : परळी येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील युवक तौहिद खान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेमुळे कायदा व

फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन


बीड : परळी येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील युवक तौहिद खान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तौहिद खान यांचा मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारा एक कथित ऑडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित ऑडिओमध्ये एका विशिष्ट समाजाविरोधात जातीवाचक उल्लेख करण्यात आल्याचा तसेच हत्येची कबुली दिल्याचा दावा केला जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण अधिक गडद झाले आहे. या घटनेमागे कोणत्याही धर्मांध किंवा समाजविघातक शक्तींचा सहभाग आहे का, याचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.तौहिद खान हत्याकांड ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून कायदा व सुव्यवस्थेला दिलेले उघड आव्हान असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.  या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे तपास कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा अन्य दबावाखाली न होता निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने करण्यात यावा, तसेच तपासात निष्पन्न होणार्‍या सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी समितीचे मुजतबा खान, प्रा. इलियास इनामदार, प्रा. शेख अमर, अ‍ॅड. जेबा शेख, शेख मुसा, अ‍ॅड. मोमीन अखिल, मुशीर इनामदार, शेख अखिल अण्णा, शेख मैनुद्दीन, पत्रकार पठाण अमरजान, सलीम खान, पाले खान, डॉ. मोसीन शेख, खदिरुज्जमा खान, शेख ऐहेतेशाम, सय्यद नबिलउज्जमा, अ‍ॅड. जावेद मणियार, अरफात खान, शामिर खान, आबेद कादरी, शेख खदीर, शेख नदीम, शाहनवाज खान, शेख मुशर्रफ, शेख जावेद आणि शेख सलमान यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS