Homeताज्या बातम्या

महावितरणमधील खांदेपालटगेवराईचे उपविभागीय अभियंता शाम मोरे यांची बदली

गेवराई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत गेवराई उपविभागात अखेर प्रशासकीय खांदेपालट झाली असून, उपविभागीय अभियंता शाम मोरे

बीड जिल्ह्यातील कारखानदाराकडून ऊस उत्पादकावर संक्रात-दत्ता वाकसे
आष्टी बसस्थानक की डुकरांचे नंदनवन?8 वर्षांचा वनवास संपणार तरी कधी?
टाकळीत उडणार धुरळा! ‘रानोबा केसरी’ बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणारनागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – युवा नेते सुरज घुले


गेवराई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत गेवराई उपविभागात अखेर प्रशासकीय खांदेपालट झाली असून, उपविभागीय अभियंता शाम मोरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीच्या आदेशानंतर महावितरणच्या प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
शाम मोरे यांचा गेवराई येथील कार्यकाळ विविध कारणांनी सातत्याने चर्चेत राहिला होता. उपविभागातील वीजपुरवठ्याची स्थिती, तांत्रिक अडचणी तसेच प्रशासकीय कारभाराबाबत वरिष्ठ स्तरावर अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे. ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणात झालेला विलंब, काही कामकाजातील संथगती आणि अंतर्गत व्यवस्थापनातील त्रुटींबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी उपविभागातील विविध कामांच्या निविदा प्रक्रिया आणि दुरुस्ती निधीच्या वापराबाबतही माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर झालेली बदली ही नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे वरिष्ठांची नाराजी आणि वाढता प्रशासकीय दबाव कारणीभूत असल्याची चर्चा महावितरणच्या वर्तुळात रंगली आहे.
नव्या अधिकार्‍यांसमोर मोठी आव्हाने
शाम मोरे यांच्या बदलीनंतर गेवराई उपविभागाचा कार्यभार नव्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात येणार आहे. तालुक्यातील विस्तीर्ण ग्रामीण भाग, शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा, थकीत वीजबिल वसुली, वाढत्या तांत्रिक अडचणी तसेच पावसाळ्याच्या तोंडावर खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, ही प्रमुख आव्हाने नव्या अधिकार्‍यांसमोर असतील. मोरे यांच्या बदलीनंतर गेवराई महावितरणच्या कारभारात अपेक्षित सुधारणा होणार का, तसेच प्रलंबित चौकशा आणि तक्रारींना गती मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. महावितरणच्या नव्या नेतृत्वाकडून अधिक पारदर्शक, जबाबदार आणि ग्राहकाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
———-

COMMENTS