कर्जबाजारी शेतकऱ्याची बँकेच्या जाचाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जबाजारी शेतकऱ्याची बँकेच्या जाचाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Video)

येवला तालुक्यातील रेंदाळ येथे दीपावलीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. कोरोना काळात हाताला काम धंदा नसल्यानं त्यात अस्मानी संकटामुळे शेतीचे

Yeola : मिशन कवच-कुंडल अंतर्गत शहरात रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुर (Video)
Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार
येवल्यातील महिलांनी गोमातेचे व वासराचे केले पूजन (Video)

येवला तालुक्यातील रेंदाळ येथे दीपावलीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. कोरोना काळात हाताला काम धंदा नसल्यानं त्यात अस्मानी संकटामुळे
 शेतीचे पुरेसे उत्पन्न न आल्याने बँकेचे कर्ज फेडणे शक्य झाले नसताना येवल्यातील एका खाजगी बँकेकडून वारंवार  तगादा होत असल्याने मानसिक खच्चीकरण आलेल्या येवला तालुक्यातील रेंडाळे गावातील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.अशोक लांडे (वय ५५) असे या शेतकऱ्याचे नाव असून लांडे यांच्यावर बँकेचे तीन ते चार लाख रुपये कर्ज असून, त्यासाठी बँकेकडून तगादा सुरू होता. त्यामुळेच लांडे यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप त्याच्या  नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान शासनाने या बँकेवर कारवाई करावी अशी मागणी मयत अशोक लांडे यांचा मुलगा महेश लांडे यांनी केला आहे.

COMMENTS