Homeताज्या बातम्या

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण

 पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या

सद्गुरू  कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात  
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण  
गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त ढाकणवाडीत वृक्षारोपण


 पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या वनस्पतीचे बिजरोपण करण्यात आले. यामध्ये लिंब, करंज, गुलमोहर,जांभूळ, सीताफळ, चिंच, बोर आदी वनस्पती बिजांचा समावेश होता. यावेळी सुमारे  तीन हजारपेक्षा जास्त बीजरोपण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबन चौरे यांनी जमिनीची धूप थांबविण्यासाठी वृक्ष हे महत्त्वाचे कार्य करतात.यासाठी वृक्षारोपण यासारखे उपक्रम आवश्यक आहे.पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाची महत्त्वाची जबाबदारी आहे.सध्या प्रचंड वृक्षतोडी मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.
पर्यावरणातील अनेक औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. तसेच वन्यजीवांचे प्रमाण कमी होत आहे. प्रदूषणासारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहे .मानवी सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून त्याची काळजी घेण्याचा संकल्प आजच्या पर्यावरण दिनी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बिजरोपण कार्यक्रमास विश्वस्त कुणाल आव्हाड, प्रकाश दिवटे, पर्यवेक्षक प्रा.सलीम शेख, डॉ.अर्जुन केरकळ, डॉ.अशोक डोळस, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, डॉ.विजय देशमुख, प्रा विजय म्हस्के, प्रा. शरद बोडके, प्रा. शेखर ससाने, प्रा. सचिन शिरसाट, प्रा. सुधीर सुडके, प्रा. सचिन वनवे, प्रा. खंडेराव डोईफोडे, प्रा.अनिल नारखेडे आदी प्राध्यापक उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुण राख,डॉ. आनंद घोंगडे, एन सी सी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.अजयकुमार पालवे यांनी केले.

COMMENTS