Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विमानतळावरुन सहा किलो सोने जप्त

सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 8 प्रवाशांवर कारवाई करत सोने आणि ब्रँडेड घड्याळे जप्त केली आहेत. कार

कर्जत तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 4 कोटी 25 लाखांचा निधी
लाचारी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर  
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे : उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 8 प्रवाशांवर कारवाई करत सोने आणि ब्रँडेड घड्याळे जप्त केली आहेत. कारवाई करण्यात आलेल्या 8 प्रवाशांकडून 3.2 कोटी रुपयांचे 6 किलो वजनी सोने आणि 3 ब्रँडेड घड्याळे जप्त केली आहेत. दरम्यान या प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान सीमा शुल्क विभागाने वेगवेगळ्या कारवाईत सोने जप्त केले. दोन दिवसात सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मुंबई विमानतळावर 8 जणांकडून 3.2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 6.19 किलो वजनी सोने जप्त केले. तसेच 3 ब्रँडेड घड्याळंदेखील जप्त केलीत. सीमा शुल्क विभागाने 8 प्रवाशांना अटक केली. अटकेत असलेले सर्व प्रवाशी हे भारतीय नागरिक आहेत. हे सर्व प्रवाशी आंतरराष्ट्रीय विमानातून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर उतरले होते. पहिल्या घटनेत मुंबई विमानतळावर केरळचा रहिवासी पकडला गेला. तो एका विमानाने दुबईहून मुंबईला आला होता. सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्याला अडवण्यात आले. अधिकार्‍यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून 54 लाख रुपये किंमतीचे 3 ब्रँडेड घड्याळे आणि 10.80 ग्रॅम वजनाचे 18 कॅरेट सोन्याचे हुक मिळाले. हे हुक त्याने आपल्या कपड्यात लपवले होते. दुसर्‍या कारवाईतील प्रवाशी हा कोल्हापूरचा रहिवासी आहे. त्याने 2 किलो 250 ग्रॅम वजनाची सोन्याची पावडर 2 पाऊचमध्ये लपवली होती. या पाऊचमध्ये ठेवलेल्या मेणात त्याने 24 कॅरेट सोन्याची पावडर लपवून ठेवली होती. त्याने या दोन्ही पाऊच आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवल्या होत्या. तर तिसर्‍या कारवाईत दुबईहून परतणारे प्रवाशी हे रायगड, केरळ आणि हरियाणातील आहेत. या प्रवाशांची तपासणी केली असता या 3 प्रवाशांकडून अनुक्रमे 1 किलो 570 ग्रॅम, 289 ग्रॅम आणि 239 ग्रॅम सोने सापडले. हे सोने त्यांनी त्यांच्या पायघोळ, बूट आणि शरीरात लपवून ठेवले होते. काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.1कोटी रुपयांचे 3.35 किलो सोने जप्त केले होते. या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS