Homeताज्या बातम्या

तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण  

संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका

गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त ढाकणवाडीत वृक्षारोपण
सद्गुरू  कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात  
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण


संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोकादायक असून हे टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत गरजेचे आहे. याकरता येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकाने किमान दोन झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे  काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे आंतरराष्ट्रीय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दंडकारण्य अभियान आढावा घेण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आ.डॉ सुधीर तांबे, पांडुरंग पाटील घुले  यांच्यासह विविध विभाग प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
 यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जगापुढे ग्लोबल वार्मिंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाढती उष्णता कमी झालेला पाऊस हे अत्यंत चिंतेचे आहे. यावर्षी देशांमध्ये कमी पाऊस सांगितला आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे या समस्या होत असून यापुढील काळात प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन केलेच पाहिजे.
 दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण व वृक्ष संवर्धन संस्कृती तालुक्यात वाढली असून सहकारातील विविध संस्थांनी तालुक्यातील डोंगरांवर वृक्षारोपण करून संवर्धन केले आहे. यावर्षीही प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ते जपावे असे आवाहन त्यांनी केले.
 तर माजी आ. डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता दंडकारण्य अभियान सुरू केले. तालुक्यामध्ये हे व्रत म्हणून काम सुरू आहे. वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. हिरवाई निर्माण होत आहे यापुढील काळातही गावोगावी प्रत्येक व्यक्तीने वृक्ष संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS