Homeअहमदनगर

कुख्यात गुंड सचिन घायवळ राजस्थानातून अटकेतवेषांतर करूनही पोलिसांच्या जाळ्यात ; नऊ महिन्यांपासून फरार

अहिल्यानगर : अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेला आणि गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला कुख्यात गुंड सचिन बन्सीलाल घायवळ

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : नगराध्यक्ष आव्हाड
जलसंपदा कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाला न्यायालयाची मान्यतागोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळाविरोधातील याचिका फेटाळली
आकाशवाणी@90 उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात  


अहिल्यानगर : अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेला आणि गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला कुख्यात गुंड सचिन बन्सीलाल घायवळ याला अखेर पुणे पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई करत राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावातून त्याला ताब्यात घेतले. या अटकेमुळे पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन घायवळ हा अनेक महिन्यांपासून सतत ठिकाणे बदलत राहत होता. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने आपला वेषही पूर्णपणे बदलला होता. वाढवलेली दाढी, विस्कटलेले लांब केस आणि बदललेली राहणी यामुळे त्याला ओळखणेही अवघड झाले होते. अटकेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये त्याचा हा बदल स्पष्ट दिसून आला.
घायवळचा शोध घेण्यासाठी पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाडा परिसरात व्यापक मोहीम राबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी तो जामखेड परिसरातील ऊसाच्या शेतातून पोलिसांच्या हाती न लागता पसार झाला होता. त्यानंतर त्याने राजस्थानमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. सचिन घायवळवर खून, खुनाचा प्रयत्न, धमकी देणे, खंडणी वसूल करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील एका शैक्षणिक संस्थेला भोजन व वाहतूक सेवा पुरवणार्‍या महिला संचालिकेकडून सुमारे 44 लाख रुपयांहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई सुरू होताच तो फरार झाला होता. पोलिसांच्या नोंदीनुसार, घायवळ टोळी पुणे आणि आसपासच्या भागात जमीन बळकावणे, व्यावसायिक तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना धमकावून आर्थिक लाभ मिळवणे आणि दहशत निर्माण करणे यांसाठी कुप्रसिद्ध आहे. कोथरूड, वारजे, कर्वेनगर आणि परिसरात या टोळीची सक्रियता असल्याचे तपासात समोर आले आहे.राजस्थानमधून अटक केल्यानंतर सचिन घायवळ याला पुण्यात आणण्यात आले असून न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेमुळे टोळीच्या इतर हालचाली, आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी जाळ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

COMMENTS