Homeताज्या बातम्या

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; सात गावांतील ८६४ हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर, चासनळी, बक्तरपूर, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिन

स्व. विलासराव देशमुख जनतेप्रती बांधिलकी जपणारे नेते; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे प्रतिपादन
भगवानगडासाठी प्रतापराव ढाकणे यांची ५१ लाखांची देणगी; ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे काम प्रगतिपथावर
उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली मुस्लिम आमदारांची बैठक; इद्रीस नायकवाडी प्रकरण आणि अल्पसंख्याक विभागाच्या प्रश्नांवर होणार चर्चा

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर, चासनळी, बक्तरपूर, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडविले जाईल, असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी गुरुवारी (दि. ४) आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह आणि परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आमदार काळे म्हणाले की, “हा बंधारा परिसरातील शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण ठेवत अर्थसंकल्पातून ४१ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.”

नैसर्गिक आपत्तीमुळे हा बंधारा यापूर्वी तीन वेळा वाहून गेला होता, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळेच या कामाला गती मिळाली, असे काळे यांनी नमूद केले. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि परिसरातील सात गावांतील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS