Homeताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशी; बंडखोरांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणी बिनविरोधचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच महायुतीने मोठे राजकीय यश मिळवले आहे. अर्ज माघार

तनपुरेंच्या प्रवेशामागे विकासाचे राजकारण की राजकारणाचा विकास? राहुरीच्या सत्तेच्या पटावर नवी समीकरणे
बारामती, राहुरी निवडणुकीचे चित्र अस्पष्ट; अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच बिनविरोधचे चित्र होईल स्पष्ट
बारामती, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँगे्रसची बारामतीत माघार, मात्र कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; दादांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी टिंगरे,  लांडे, तटकरे मैदानात,...

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच महायुतीने मोठे राजकीय यश मिळवले आहे. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी अनेक मतदारसंघांतील बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले. परिणामी, १७ पैकी ५ जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या जागा महायुतीच्या पारड्यात पडणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली असून काही उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत, तर अनेक मतदारसंघांत थेट आणि चुरशीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.

ठाणे मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे तसेच सय्यद फारुख यांनी अर्ज मागे घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांचा बिनविरोध विजय झाला आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातही काँग्रेसचे शैलेशकुमार अग्रवाल आणि अपक्ष सुधीर कोठारी यांनी माघार घेतल्याने भारतीय जनता पक्षाचे अरुण लखानी बिनविरोध विजयी ठरले.

नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे गणेश गीते यांनी अर्ज मागे घेतला असला, तरी गोकुळ गीते निवडणुकीत कायम आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात थेट सामना होणार आहे. सांगली-सातारा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप यांच्यातील लढत निश्चित झाली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसचे दिनेश ढोबळे, अपक्ष सुरेंद्र लोही आणि राजेंद्र जोंगले यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महायुतीचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात सरळ सामना रंगणार आहे.

सोलापूरमध्ये आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी माघार घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख हे दोघेच मैदानात उरले आहेत. नांदेडमध्ये महायुतीने अंतर्गत नाराजी दूर करण्यात यश मिळवले. प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे रामदास पाटील आणि महायुतीचे अमर राजूरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे दिलीप बनसोडे आणि बंडखोर प्रफुल्ल अग्रवाल यांनी अर्ज मागे घेतले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेश ईश्वरकर यांची उमेदवारी कायम आहे. त्यामुळे येथील निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे.

अमरावती मतदारसंघात त्रिरंगी लढत पाहायला मिळणार असून भारतीय जनता पक्षाचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेचे सईद खान, उद्धव ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख हे रिंगणात कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे त्रिरंगी सामना होणार आहे. धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भारतीय जनता पक्षाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे. जळगावमध्ये विविध पक्षांतील बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर माघार घेतली. तरीही भारतीय जनता पक्षाचे नंदकिशोर महाजन, उद्धव ठाकरे गटाचे शरद तायडे आणि काही अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक चुरशीची राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुहास शिरसाट आणि उद्धव ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट सामना होणार आहे. देवयानी डोणगावकर आणि समीर सत्तार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने येथे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये करण ससाणे यांची माघार अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने मैदानात उतरलेले करण ससाणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज कायम असल्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या वतीने अर्ज मागे घेतल्याचा दावा करण्यात आला असला, तरी पानसरे यांनी स्वतः माघार घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महायुतीत जागावाटप, बंडखोरीवरून नाराजी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचेही दिसून आले. जागावाटप आणि बंडखोरीच्या मुद्द्यावरून काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र वरिष्ठ नेतृत्वाने समन्वय साधत मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अर्ज माघारीनंतरचे चित्र पाहता अनेक मतदारसंघांत महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून मतदानापूर्वीच निवडणुकीचा कल मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने झुकल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाविकास आघाडीचे म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे. विशेष म्हणजे, अर्ज मागे घेण्यापूर्वी बाळ माने हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. या वेळी त्यांनी संख्याबळ नसल्याने आपण माघार घेत असल्याचे सांगितले.

COMMENTS