Homeताज्या बातम्या

शिर्डीतील शिवसेना मेळाव्यास कोपरगावच्या शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ८० टक्के समाजकारणावर भर

कोपरगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा भव्य मेळावा मंगळवारी (दि. २) शिर्डी येथे

जोर्वे संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; सात गावांतील ८६४ हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान
संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोमनाथ गोडसे; तर उपाध्यक्षपदी शाम पोळ

कोपरगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा भव्य मेळावा मंगळवारी (दि. २) शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला कोपरगाव तालुक्यासह शहरातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोपरगावचे शिवसेना शहरप्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष अस्लम शेख, समन्वयक मुन्ना मन्सूरी, तसेच युवा सैनिक निखिल कंक्राळे, ऋषी खैरनार, कान्हा हाडा, वैभव शेलार, विनय टाक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यादरम्यान शहरप्रमुख गगन हाडा यांनी खासदार संजय राऊत यांच्याशी कोपरगावमधील पक्षसंघटनाबाबत चर्चा केली. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन शहरातील संघटन बळकट करण्यावर भर दिला जाईल आणि प्रत्येक विभागात शिवसेनेची नवीन शाखा सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करत विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS