Homeताज्या बातम्या

जलंब येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा उत्साहात संपन्न; आंबेडकरी अनुयायांची मोठी उपस्थिती

जलंब (शेगाव) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पदस्पर्शाने पावन झालेल्या जलंब नगरीत आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पद

मान्सून महाराष्ट्रात दाखल; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
सोलापूर-कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये १.२७ कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त; दागिन्यांच्या चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अमेरिका-इराण युद्धाचा पुन्हा भडका; इराणसाठी होर्मुझ सामुद्रधुनी हे सर्वात मोठे शस्त्र

जलंब (शेगाव) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पदस्पर्शाने पावन झालेल्या जलंब नगरीत आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

पुण्यभूमीतील या कार्यक्रमाचे उद्घाटन भंते राजज्योती व भिक्खू संघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर, सामाजिक समतेचा संदेश आणि संविधान मूल्यांचे जतन करण्याची गरज यावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी आयोजित भीमगीते व सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक धम्मानंद सिरसाट, अश्विनीताई राजगुरू (मुंबई) आणि लोकप्रिय गायक महेंद्रभाऊ सावंग यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. या ऐतिहासिक स्मृती जतन करणाऱ्या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुनील गव्हांदे व सौ. पुष्पाताई सुनील गव्हांदे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर प्रसिद्धीसाठी ज्येष्ठ पत्रकार नारायण दाभाडे, विवेक विजय शेगांवकर व गौतम इंगळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

COMMENTS