Homeताज्या बातम्या

लोकशाही पत्रकार संघाच्या उद्योग विकास समिती पुणे जिल्हा अध्यक्षपदी सारिका श्रीराम कदम यांची नियुक्ती

बीड : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या 'लोकशाही पत्रकार संघामध्ये' सध्या विविध ७२ विकास समित्या कार्यरत असून, त्या अंतर्गत राज्यभरा

अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावामानसतज्ञ व समुपदेशक मनीषा बिक्कड- घुले यांचे प्रतिपादन
गुणवंत शिक्षिका मसरत सुलताना अन्सारी यांना ‘क्रांतीज्योती फातिमा शेख स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार’ जाहीर
सर्पदंशाने दहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजने’पासून वंचित असल्याचा आरोप

बीड : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ‘लोकशाही पत्रकार संघामध्ये’ सध्या विविध ७२ विकास समित्या कार्यरत असून, त्या अंतर्गत राज्यभरात नियुक्त्या जाहीर केल्या जात आहेत. याच अनुषंगाने संघटनेच्या उद्योग विकास समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सारिका श्रीराम कदम यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

ही नियुक्ती लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत वैद्य, राष्ट्रीय अध्यक्षा (महिला आघाडी) हालिमा शेख, राज्य मार्गदर्शक विजेंद्रजी डुलगच, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंखे पाटील, प्रदेश युवा अध्यक्ष किशोर पवार, प्रदेश सचिव गणेश जगदाळे तसेच उद्योग विकास समितीच्या प्रदेश उपाध्यक्ष शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. वैद्य, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब खान पठाण, बीड जिल्हाध्यक्ष तथा ‘सायं दैनिक बीड सरकार’चे संपादक साहस अदोडे, अ‍ॅड. श्रीकांत जाधव, ह. भ. प. फपाळ महाराज, बाजीराव गायकवाड, डॉ. दीपक तांगडे, बाजीराव ढाकणे, डॉ. गजानन वटाणे, संजय कुलकर्णी आणि पूजा काळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सारिका कदम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत संघटनेच्या माध्यमातून उद्योग विकासाचे उत्कृष्ट कार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल सारिका कदम यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS