Homeताज्या बातम्या

सर्पदंशाने दहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजने’पासून वंचित असल्याचा आरोप

बीड : तालुक्यातील बालाघाट परिसरातील बेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत बेळगाववस्ती येथे सर्पदंशामुळे दहा वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घ

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा – रतन गुजर
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा नागरिकांचा आरोप
न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी; आनंदराज आंबेडकर यांचा शब्द

बीड : तालुक्यातील बालाघाट परिसरातील बेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत बेळगाववस्ती येथे सर्पदंशामुळे दहा वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाची जिल्हा रुग्णालयात योग्य नोंद न घेण्यात आल्याने संबंधित कुटुंब शासनाच्या ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने’पासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी रोहिदास कोळपे हे कुटुंबासह घरासमोरील अंगणात झोपले होते. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा दहा वर्षीय मुलगा सोहम रोहिदास कोळपे अचानक झोपेत किंचाळला आणि उजव्या पायावर साप चावल्याचे त्याने सांगितले. त्याच्या पिंडरीवर दातांच्या खुणा व रक्त दिसून आले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने मुलाला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलविले.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील ओपीडीतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, कोणतीही वैद्यकीय नोंद, पोलीस माहिती किंवा आवश्यक शासकीय प्रक्रिया न करताच मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधित पीडित कुटुंबाला शासनाच्या अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंकी यांच्याकडे केली आहे.

COMMENTS