बीड : शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बीड जिल्ह्यातील गुणवंत शिक्षिका मसरत सुलत

बीड : शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बीड जिल्ह्यातील गुणवंत शिक्षिका मसरत सुलताना अन्सारी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘क्रांतीज्योती फातिमा शेख स्मृती आदर्श उपक्रमशील शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६’ जाहीर झाला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आणि सहाव्या वर्षात पदार्पण सोहळ्याच्या औचित्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे.
मसरत सुलताना अन्सारी या शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि उपक्रमशील शिक्षिका म्हणून परिचित आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण समजली जाणारी ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सीटीईटी) त्यांनी तब्बल तीन वेळा उत्तीर्ण केली आहे. अध्यापनात आधुनिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या सामाजिक दायित्वाची दखल घेत यापूर्वी त्यांना ‘डॉ. झाकीर हुसेन आदर्श शिक्षिका पुरस्कार’ आणि ‘राज्यस्तरीय स्त्री रत्न पुरस्कार – २०२५’ देऊन गौरविण्यात आले आहे.
२० जून रोजी होणार भव्य गौरव सोहळा: या पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बीड शहरातील ‘ताज पॅलेस’ (कादरपुरा, बार्शी नाका) येथे आयोजित भव्य समारंभात करण्यात येणार आहे. या सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मसरत सुलताना अन्सारी यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS