Homeताज्या बातम्या

आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पाठीशी मी सदैव; विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड : आमदार बालाजीराव कल्याणकर हे अत्यंत प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. मतदारसंघाच्या विकासाची त्यांना सातत्याने त

ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट
राज्यात शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक?; विरोधी गटातील खासदारांवर मात्र लक्ष कायम
अवकाळीचा तडाखा !

नांदेड : आमदार बालाजीराव कल्याणकर हे अत्यंत प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. मतदारसंघाच्या विकासाची त्यांना सातत्याने तळमळ असते. मी त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा असून नांदेड उत्तरच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मरळक येथे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन सोहळा, शेतकरी मार्गदर्शन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दूरध्वनी/संदेशामार्फत शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, संध्याताई कल्याणकर, जिल्हाप्रमुख बडूरे, किशन कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कीर्तन सोहळ्यात मार्गदर्शन करताना हभप विशाल महाराज खोले यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे मरळककर यांच्या नियोजनात झालेल्या या सोहळ्यात हजारो भाविकांनी हरिनामाचा आनंद घेतला. कीर्तनानंतर महाप्रसादाचे (नगरभोजन) आयोजन करण्यात आले होते.

जनतेच्या सुखातच माझे सुख – आ. बालाजीराव कल्याणकर “नांदेड उत्तर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या सुखात मी माझे सुख मानतो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणूनच मला दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. ही आमदारकी मी तुमच्या चरणी अर्पण करतो,” अशी भावनिक साद आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना घातली.

COMMENTS