Homeताज्या बातम्या

पोहेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; नितीनराव औताडे यांच्याकडून कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे रविवारी (दि. ३१ मे) ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्स

रुढींना फाटा देत ‘देहदानाचा’ आदर्श! वडिलांचे पार्थिव वैद्यकीय शिक्षणासाठी दान; राहात्यातील गांधी कुटुंबाचा निर्णय
राहुरीत रहस्यमय ड्रोनचे गूढ अधिक गडद; अँटी-ड्रोन पथकाची कारवाई निष्फळ, आकाशात १० ड्रोन दिसल्याचा दावा
आश्वी बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; शेतकऱ्यांना करणार आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
पोहेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती  उत्साहात साजरी – Om Sai News

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे रविवारी (दि. ३१ मे) ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, उपसरपंच अमोल औताडे, भाऊसाहेब सोनवणे, संभाजी सोनवणे, रामनाथ सोनवणे, राजेंद्र सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, विकास सोनवणे, मारुती सोनवणे, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे यांच्यासह पोहेगाव परिसरातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कुशल प्रशासनाची, समाजहितासाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची माहिती दिली. तसेच जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पोहेगावच्या ऐतिहासिक वारशाविषयी माहिती देत समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच अमोल औताडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS