Homeताज्या बातम्या

महायुतीचा विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटला; ११-४-२ चा फॉर्म्युला ठरला, तिन्ही पक्षांमध्ये एकमत

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर, अखेर विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे अं

नांदेड विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स उद्या संपणार? उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय चित्र स्पष्ट होणार
राष्ट्रवादीत मोठी फेरबदल! प्रफुल्ल पटेलांचे पद गेले, सुनेत्रा पवारांच्या नव्या पत्राने पार्थ आणि जय पवारांची ताकद वाढली
इतर राज्यातील मुख्यमंत्री उदयोग धंदे पळवतील अस होत नाही :अजित पवार | LOKNews24

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर, अखेर विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये दीर्घ चर्चेनंतर जागांवर एकमत झाले असून, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात न झाल्याने या मतदारसंघांतील जागा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. नियमानुसार एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के मतदार असतील तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार आहे. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब झाले असून अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे, तर ७ जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागले.

निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

  • निवडणुकीची अधिसूचना: २५ मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख: १ जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी: २ जून
  • अर्ज माघारीची मुदत: ४ जून
  • मतदान: १८ जून
  • मतमोजणी: २२ जून

कोणाला कोणती जागा?

  • भाजप (११ जागा): सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड.
  • शिवसेना (४ जागा): ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ.
  • राष्ट्रवादी काँग्रेस (२ जागा): कोकण, पुणे.

COMMENTS