Homeताज्या बातम्या

सोनईत बिबट्याचा वासरावर हल्ला; लांडेवाडी रस्ता परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार सुरू झाल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनई

पुणतांबा येथील ऐतिहासिक घाटाच्या विकासासाठी निधीची मागणी; आ. आशुतोष काळे यांचे पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन
देशात भ्रष्टाचारामुळे मोठी अराजकता; काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका; संगमनेरच्या सहकार पंढरीला भेट
पुढच्या १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीत मोठी घोषणा
मापगावमध्ये बिबट्याचा हल्ला; परिसरात भीतीयुक्त वातावरण - Krushival

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार सुरू झाल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनई जवळील लांडेवाडी रस्त्यावरील शरद गडाख यांच्या वस्तीवर मंगळवारी पहाटे बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली.

माहितीनुसार, पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने थेट जनावरांच्या गोठ्यात प्रवेश करत वासरावर झडप घातली. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई-लांडेवाडी रस्ता परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून, रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जाण्यास शेतकरी धास्तावले आहेत.

यापूर्वीही परिसरात बिबट्याने अनेक शेळ्या, बोकड तसेच पाळीव कुत्र्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर काहीसा कमी झाला होता, मात्र आता पुन्हा बिबट्याने या भागात आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक राहुल शिसोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला.

COMMENTS