Homeताज्या बातम्या

वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम

कर्जत : तीव्र उन्हाळा, वाढते तापमान आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांमुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका नी

विषारी दारूमुळे मृतांची संख्या २२ वर; गावरान दारूमध्ये ‘मिथेनॉल’ मिसळल्याने अनेकांचा मृत्यू
कर्जतमध्ये हॉटेलमधील आचाऱ्याचा निर्घृण खून; उत्तर प्रदेशातील तीन आरोपींना दौंड रेल्वेस्थानकावरून घेतले ताब्यात
पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल

कर्जत : तीव्र उन्हाळा, वाढते तापमान आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांमुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका नीता कचरे यांनी अनोखा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

शासनाच्या नव्या नियमानुसार शासकीय अनुदान घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची “हयात असल्याची” (Life Certificate) संगणकीय नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही नोंद न झाल्यास संबंधितांचे अनुदान बंद होते. यासाठी वृद्धांना तहसील कार्यालय किंवा सुविधा केंद्रावर जावे लागत होते. वयोमान, शारीरिक अडचणी आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

ही अडचण लक्षात घेऊन नगरसेविका नीता कचरे यांनी प्रभागातील वृद्ध महिला व पुरुषांना त्यांच्या परिसरात एकत्रित बोलावून “हयाती” नोंदणी शिबिर आयोजित केले. या शिबिरात सर्वांची संगणकीय नोंदणी स्वखर्चातून करून देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रत्येकाकडून आकारले जाणारे सुमारे दोनशे रुपयांचे शुल्कही त्यांनी स्वतः भरले.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १५३ वृद्धांची हयात नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. उन्हात ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे नीता कचरे यांनी सांगितले. या मानवी संवेदनांना स्पर्श करणाऱ्या उपक्रमाचे कर्जत शहरात मोठे कौतुक होत आहे.

COMMENTS