Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले; महिन्यातभर चौथ्यांदा दरवाढ, सर्वसामान्यांना फटका

नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सोमवारी वाढ करण्यात आली आहे. ग

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण
घरगुती गॅस सिलिंडर 29 रूपयांनी महागतीन महिन्यांत 89 रूपयांनी महागाईचा फटका
इंधन दरवाढीचा पुन्हा झटकापेट्रोल-डिझेल 90 पैशांनी महागले
fuel price hike : पेट्रोल डिझलच्या किंमतीत आणखी वाढ! दोन आठवड्यात चौथ्यांदा  इंधनाचे दर भडकले, अमेरिका-इराण युद्ध कधी थांबणार?

नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सोमवारी वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २ रुपये ६१ पैशांची, तर डिझेलमध्ये २ रुपये ७१ पैशांची वाढ जाहीर करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरगुती अर्थकारण, वाहतूक खर्च आणि बाजारभावावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नवीन दरांनुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०२ रुपये १२ पैसे, तर डिझेलचा दर ९५ रुपये २० पैसे प्रतिलीटरवर पोहोचला आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नईसह अनेक महानगरांमध्ये पेट्रोलचे दर ११० रुपयांच्या पुढे गेले आहेत. डिझेलचे दरही अनेक शहरांत शंभर रुपयांच्या उंबरठ्यापाशी पोहोचल्याने मालवाहतूक, शेती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात २ रुपये ७२ पैशांची वाढ होऊन दर १११ रुपये २१ पैसे झाला आहे. डिझेल २ रुपये ८१ पैशांनी महागून ९७ रुपये ८३ पैशांवर पोहोचले आहे. कोलकात्यात पेट्रोल ११३ रुपये ५१ पैसे, तर डिझेल ९९ रुपये ८२ पैसे इतके झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०७ रुपये ७७ पैसे आणि डिझेल ९९ रुपये ५५ पैसे दराने विकले जात आहे. या महिन्यात यापूर्वी १५, १९ आणि २३ मे रोजी इंधन दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच पेट्रोलमध्ये ८७ पैसे आणि डिझेलमध्ये ९१ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सततच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

सरकारी तेल कंपन्या वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती असूनही जुने दर कायम ठेवत होत्या. मात्र, सतत वाढणारा आर्थिक ताण लक्षात घेता अखेर दरवाढ करणे अपरिहार्य झाल्याचे सांगितले जात आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांना दरमहा हजारो कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मते, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅस विक्रीतून कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश कच्चे तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम देशातील इंधन दरांवर होत असतो. कच्च्या तेलाची मूळ किंमत, शुद्धीकरण खर्च, केंद्राचे उत्पादन शुल्क, विक्रेत्यांचे कमिशन आणि राज्य सरकारांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) यांचा समावेश होऊन अंतिम दर निश्चित केला जातो. राज्यानुसार करांचे प्रमाण वेगवेगळे असल्याने प्रत्येक शहरातील इंधन दरही वेगवेगळे असतात.

वस्तूंच्या किमतीही महागण्याची शक्यता इंधन दरवाढीचा परिणाम आता इतर वस्तूंच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने भाज्या, फळे, धान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होऊ शकतात. ट्रॅक्टर, पंप आणि शेती उपकरणांसाठी डिझेलवरील खर्च वाढल्याने शेती उत्पादन खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बस, रिक्षा आणि शालेय वाहनांच्या भाड्यातही वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS