कोपरगाव : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, कोपरगाव मतदारसंघाच

कोपरगाव : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी येथे मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत केले.
शिर्डी-सावळीविहीर (एम.आय.डी.सी.) येथे आयोजित देशाच्या संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या ‘क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्प’ लोकार्पण सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते आले होते. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करत मतदारसंघाच्या वतीने सदिच्छा भेट घेतली.
या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याच्या वेळी विधान परिषदेचे उपसभापती (माजी सभापती) प्रा. राम शिंदे, राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह विविध राजकीय, शासकीय क्षेत्रातील मान्यवर आणि उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS