Homeताज्या बातम्याबीड

धाराशिवमध्ये नीट यूजी 2026 पेपर लीक प्रकरणाविरोधात युवक काँग्रेस व एनएसयूआयचे आंदोलन; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित पेपर लीक, गैरव्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस व धाराशिव जिल्हा छडणख यां

लोकशाही पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप दरंदले
रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचे अनावरण
बुलडाणा जिल्ह्यात धावली पहिली लालपरी, चोख पोलीस बंदोबस्तात बस आगारातून बाहेर | LOKNews24



नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित पेपर लीक, गैरव्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस व धाराशिव जिल्हा छडणख यांच्या वतीने सोमवार (दि. 18 मे 2026) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी निवासी जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
देशभरातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीट परीक्षेची तयारी करत असतात. अनेक वर्षांची मेहनत, आर्थिक त्याग आणि मानसिक ताण सहन करून विद्यार्थी व पालक या परीक्षेकडे आशेने पाहतात. मात्र नीट यूजी 2026 संदर्भात समोर आलेल्या पेपर लीक, गैरव्यवहार आणि निष्काळजीपणाच्या आरोपांमुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. युवक काँग्रेस व एनएसयूआय पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकार व राष्ट्रीय परीक्षा एजन्सीवर (एनटीए)परीक्षा व्यवस्थापनात अपयश आल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचे म्हटले. देशभरातून विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नीट यूजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सीबीआयकडून अटकसत्र सुरू असल्याच्या घडामोडी समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या : नीट परीक्षेतील संपूर्ण गैरव्यवहाराची सर्वोच्च स्तरावर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी. पेपरफुटी व भ्रष्टाचारात सहभागी आरोपींवर कठोर फौजदारी कारवाई करावी. दोषींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात खटले चालवावेत. एनटीए च्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक सुधारणा कराव्यात. नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. भविष्यात पारदर्शक व सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी. या आंदोलनात युवक काँग्रेस व एनएसयूआय चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी काँग्रेस नेते उमेशराजे निंबाळकर, जिल्हाध्यक्ष गणेश पवार, अ‍ॅड. मुशरफ सय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.

COMMENTS