देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात एका ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सुभाष भीमा गायकवाड (वय ३५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरातील खिडकीला गळफास घेतल्याचे सकाळी निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी राहुरी पोलिसांना कळविले.पोलिस हवालदार बाबासाहेब शेळके व प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर रुग्णवाहिका चालक रविंद्र देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.मृत सुभाष गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS