Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

केरळमध्ये आज नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी; व्ही. डी. सतीशन सांभाळणार धुरा

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (UDF) मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर व्ही. डी. सतीशन सोमवार, १८ मे रोजी

राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वाधिक ‘रिजेक्टेड’ व्यक्ती; देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून जोरदार प्रहार
महागाईचा धक्का टप्प्याटप्प्याने देण्याचे सरकारचे सूत्रगॅस दरवाढीवरून खा. शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
तटकरे – पटेल यांची स्थिती नेमकी काय?
Kerala CM VD Satheesan Oath LIVE Updates: Congress Leader to Be Sworn In As Chief  Minister, UDF, Rahul Gandhi, Shashi Tharoor

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (UDF) मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर व्ही. डी. सतीशन सोमवार, १८ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तब्बल दहा वर्षांनंतर राज्याच्या सत्तेत काँग्रेसचे पुनरागमन होत असून, हा भव्य शपथविधी सोहळा तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

राजधानी तिरुवनंतपुरममध्ये शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. व्ही. डी. सतीशन यांच्यासोबत नव्या मंत्रिमंडळातील काही सदस्यही शपथ घेऊ शकतात. संयुक्त लोकशाही आघाडीतील घटक पक्षांमध्ये खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या संख्येबाबत चर्चा पूर्ण झाली आहे.

या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच खासदार प्रियांका गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १४० सदस्यसंख्या असलेल्या केरळ विधानसभेत संयुक्त लोकशाही आघाडीने (UDF) १०२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यापैकी काँग्रेसने एकट्याने ६३ जागा जिंकल्या आहेत. या निकालामुळे केरळमधील दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची पारंपारिक परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

COMMENTS