Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू बाबा अशोक खरातला तुरुंगातही मिळणार भूसंपादनाचे तीन कोटी; अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा

अहिल्यानगर : महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे सध्या पोलीस कोठडीत असलेल्या नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या कुटुंबाला शास

प्रशिक्षणादरम्यान पोलीस मुख्यालयात ‘हँडग्रेनेड’चा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी, प्रकृती स्थिर
पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड पशुपालकांसाठी ‘मृगजळच’
चारणवाडीत छापा टाकून ११ लाखांचा गांजा जप्तपारनेर पोलिसांची मोठी कारवाई ; आरोपी फरार
Ashok Kharat case update: "मला काही सांगायचं..." म्हणणाऱ्या अशोक खरातला  पुन्हा ७ दिवसांची पोलीस कोठड - Marathi News | Mumbai Tarun Bharat

अहिल्यानगर : महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे सध्या पोलीस कोठडीत असलेल्या नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या कुटुंबाला शासनाकडून भूसंपादनाच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणाची जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कुंभमेळा वर्तुळ मार्ग’ (Ring Road) प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी विविध भागांतील जमिनी संपादित केल्या जात असून, त्यामध्ये अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनींचाही समावेश आहे. या प्रक्रियेत खरात कुटुंबाला एकूण सुमारे तीन कोटी रुपयांचा मोबदला मिळणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, गौळाणे शिवारातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांना सुमारे ८२ लाख ८३ हजार रुपयांचा मोबदला मंजूर झाला आहे. तर पाथर्डी शिवारातील जमिनीच्या संपादनापोटी खरातच्या मुली तृप्तबाला आणि सृष्टी खरात यांना मिळून जवळपास १ कोटी ८२ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

वादग्रस्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीचेही नाव चर्चेत?
या भूसंपादन प्रक्रियेत आणखी काही वादग्रस्त नावे समोर आल्याची चर्चा आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या आणि सध्या निलंबित असलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या (Deputy Collector) पत्नीचाही या व्यवहाराशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित महिलेला देखील मोठ्या प्रमाणात मोबदला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अशोक खरात हा गंभीर गुन्ह्यांच्या तपासामुळे पोलीस कोठडीत असल्याने, भूसंपादनाशी संबंधित प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी तो उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया त्याच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून पूर्ण केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत आलेल्या या भोंदू बाबाला आता भूसंपादनातून कोट्यवधी रुपये मिळणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तपास यंत्रणा या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS