Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

बिलोली तालुक्यातील 30 गावांचा पीक विमा रखडला; 29 कोटींच्या भरपाईची शेतकर्‍यांना प्रतीक्षा

बिलोली तालुक्यात सन 2025-26 मध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेषतः

बिलोली तालुक्यातील अवैध रेती प्रकरण; अंदाज समितीच्या निर्देशांवर संशय, कारवाईच्या मागणीसाठी अमरण उपोषण तिसर्‍या दिवशी
ओव्हरलोडिंग धोकादायक; अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
वन विभागाकडून वानराच्या पिल्लाची सुटका



बिलोली तालुक्यात सन 2025-26 मध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेषतः सोयाबीन व उडीद पिकांचे नुकसान झाल्याने शासनाकडून पीक विमा मंजूर करण्यात आला. काही गावांतील शेतकर्‍यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा झाली असली तरी तालुक्यातील 30 गावांतील शेतकरी आजही भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बिलोली तालुक्यात एकूण 92 महसुली गावे असून त्यापैकी 62 गावांतील शेतकर्‍यांना मंजूर झालेला पीक विमा खात्यावर जमा करण्यात आला आहे. मात्र उर्वरित 30 गावांतील शेतकर्‍यांना अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी वारंवार बँका व कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. तालुक्यात बिलोली, लोहगाव, रामतिर्थ, आदमपूर, सगरोळी आणि कुंडलवाडी अशी एकूण सहा महसूल मंडळे आहेत. या सर्व मंडळांतील शेतकर्‍यांसाठी तब्बल 86 कोटी 47 लाख 33 हजार 38 रुपये इतकी विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी चार मंडळांतील शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली असली, तरी बिलोली व कुंडलवाडी मंडळातील 30 गावांतील शेतकर्‍यांची सुमारे 29 कोटी 21 लाख रुपयांची भरपाई अद्याप प्रलंबित आहे. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून लग्नकार्य, औषधोपचार, कर्जफेड व इतर खर्चांसाठी त्यांना पैशांची नितांत गरज आहे. मात्र मंजूर रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात बँकांमधील निधीअभावी शेतकर्‍यांना रोज हेलपाटे मारावे लागत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

COMMENTS