जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे वय 88 वर्ष यांचे दि.14 मे 2026 रोजी बीड येथील निवासस्थानी दि 14 रोजी

जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे वय 88 वर्ष यांचे दि.14 मे 2026 रोजी बीड येथील निवासस्थानी दि 14 रोजी पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता बीड येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नागरिक,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे या मूळ राहणार अंबड येथील असून त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. जुन्या पिढीतील धार्मिक वृत्तीच्या श्रीमती मालतीबाई वाघमारे अंबड मध्ये मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित आहेत. काही महिन्यापूर्वीच मोठे चिरंजीव प्रसिद्ध निवेदक स्व मंगेश वाघमारे यांचे निधन झाले,त्यांनतर त्या बीड येथे पत्रकार महेश वाघमारे यांच्या निवासस्थानी राहत होत्या.गुरुवारी अचानक पहाटेच त्यांची प्राणज्योत मालवली,निधनाचे वृत्त कळताच वाघमारे यांच्याकडे अनेकांनी सांत्वन भेट दिली.

COMMENTS