Homeताज्या बातम्याअहमदनगर

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे विकासकामांतील अडथळे दूर : साबळे

कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही मागील पाच ते सहा महिन्यांपासून काही

‘संत ज्ञानेश्वर’चा दहावीचा १०० टक्के निकाल
कोपरगाव नगरपरिषदेत २९ महत्त्वपूर्ण निर्णयविकासकामांना गती; प्लास्टिक बंदीपासून सीसीटीव्हीपर्यंत विविध ठरावांना मंजुरी
घरात भरधाव डंपर घुसलाविवाहिता गंभीर; राहुरीतील घटना; घराचे मोठे नुकसान

कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही मागील पाच ते सहा महिन्यांपासून काही प्रभागांतील विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात होते. अनेक वेळा निवेदने देऊनही कामे होत नव्हती. मात्र जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नगराध्यक्षांचे वित्तीय व कार्यकारी अधिकार संपुष्टात आणल्याने शहर विकासातील मोठी अडचण दूर झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी सांगितले. कोपरगाव येथील गौतम बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे की, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील कलम ५८ (१) (ब) नुसार नगराध्यक्षांचे पालिकेच्या वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार वगळण्यात आले आहेत. तसेच कलम ७७ (१) (अ) मधील मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजावरील नियंत्रणासंदर्भातील तरतूदही हटविण्यात आली आहे. ३१ मार्च २०१८ च्या शासन राजपत्रानुसार या सुधारणा लागू करण्यात आल्या असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शैलेश साबळे म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून काही प्रभागांतील विकासकामे रखडवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे विकासकामांतील अडथळे दूर होऊन कामांना गती मिळेल.”आमदार आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीतील कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून त्या कामांना लवकरच सुरुवात होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.पत्रकार परिषदेस नगरसेवक इम्तियाज अत्तार, वाल्मिक लाहीरे, राजेंद्र वाकचौरे, सोमनाथ आढाव, विजय त्रिभुवन, तुषार गलांडे, वैभव कानडे, फकीर कुरेशी, चंद्रशेखर म्हस्के यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS