Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार ः निलेश गायकवाड                                    

श्रीगोंदा - वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे   युवा जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी केले. ते श्रीग

झाडावरच्या बोरांच्या आमीषाने मुलाला गमवावा लागला प्राण…
BREAKING:अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना घेऊन येणाऱ्यास ५००० बक्षीस |Lok News24
रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग

श्रीगोंदा – वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे   युवा जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी केले. ते श्रीगोंदा येथे पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभात बोलत होते. ते पुढे म्हणाले वंचित ही एक सामाजिक चळवळ आहे या सामाजिक चळवळीमध्ये बुद्धीची वर्ग पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे आता आपणा सर्व युवकांची जबाबदारी आहे की संविधान वाचवायचा किंवा संपवायचे, यामुळे आपणा सर्वांना संविधानाच्या माध्यमातून न्याय व हक्क मिळणार आहेत संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी चुकीचे काम केल्यास त्याचे पाठ राखण केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. इथून पुढे पूर्ण ताकतीनिशी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व निवडणुका लढवणार आहे कोणत्याही राजकीय प्रक्रियेमध्ये वंचित माघे राहणार नाही. यावेळी युवा जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे उपाध्यक्ष सचिन घोडके, अशा सर्व नवनिर्वाचित युवा जिल्हा पदाधिकार्‍यांचा यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला,  यावेळी नूतन जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडके यांनी  शोषित वंचित कष्टकरी शेतकरी कामगार यांना  न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच आपसातील हेवेदावे सोडून एक दिलाने काम करा, प्रत्येक गावात पक्षाची शाखा बांधणी करा, एडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांचे हात प्रकट करण्यासाठी पक्षाची ताकत बळकट करण्यासाठी एक जुटीने काम करा.सर्वांनी जबाबदार्‍या स्वीकारुन येणार्‍या आगामी निवडणूक लढाईसाठी सज्ज राहावे असे सर्व पदाधिकार्‍यांना अव्हान केले. यावेळी विवेक घोडके शेखर घोडके, चंपालाल घोडके, दत्ता घोडके कांतीलाल घोडके, सिद्धार्थ घोडके, मच्छिंद्र घोडके, प्रशांत घोडके, नवनाथ भोसले, आबा रामफळे, राहुल भोसले (चेअरमन) बौद्धाचार्य अरूण पठारे, प्रेम जाधव, तुषार चव्हाण साळवे शहराध्यक्ष लक्ष्मण भोसले विलास घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तालुकाध्यक्ष संतोष जंजाळ यांनी केले तर शहराध्यक्ष लक्ष्मण भोसले यांनी आभार मानले.

COMMENTS