Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नागपूर, वर्ध्यात उष्णतेची लाट

नागपूर : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 16 ते 18 मे या कालावधी

जिल्ह्यात 1दिवसासाठी यलो अलर्ट जारी
राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट
उत्तर भारतात वादळाचा कहर ; 94 जणांचा मृत्यू


नागपूर : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 16 ते 18 मे या कालावधीत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन विविध खबरदारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचार या वेळेत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

COMMENTS