Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

एका महिन्यात नांदेड जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश1098 हेल्पलाईनच्या मदतीने महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई

नांदेड जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गेल्या एका महिन्यात तब्बल 36

कृषि विभागाची धडक कारवाईविनापरवाना बीटी कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू



नांदेड जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गेल्या एका महिन्यात तब्बल 36 बालविवाह रोखण्यात आले आहेत. महिला व बाल विकास विभाग, जिल्हा प्रशासन आणि चाईल्ड लाईन 1098च्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या नेतृत्वात 12 एप्रिल ते 13 मे या कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांच्यासह विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी गावपातळीवर जाऊन बालविवाह थांबवले. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात विविध भागांत अल्पवयीन मुलामुलींचे विवाह होणार असल्याच्या तक्रारी 1098 हेल्पलाईनवर प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने समुपदेशन, पडताळणी आणि जनजागृतीच्या माध्यमातून नियोजित विवाह रोखले. कारवाईदरम्यान तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ संरक्षण अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. संबंधित मुलगा व मुलींचे वय तपासून कायद्याअंतर्गत बालविवाह रोखण्यात आले. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांतच सहा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये लोहा, नायगाव, कंधार, बिलोली आणि उमरी तालुक्यातील घटनांचा समावेश आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बालविवाह रोखण्यात आलेल्या मुलींना पुढील संरक्षणासाठी बाल कल्याण समितीकडे सादर करण्यात येत आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत मुलाचे विवाहासाठी किमान वय 21 वर्षे तर मुलीचे 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

COMMENTS