Homeताज्या बातम्यापुणे

आरपीआयचे पदाधिकारी अनिल मोरे यांची हत्या

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रिपब्लिकन पक्

गावठी कट्टे विकणारा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त ; ६२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा धिंडवडा; जुन्या वादातून रिक्षाचालकावर कोयत्याने वार करून थेट पुलावरून खाली फेकले, थरारक व्हिडिओ व्हायरल!


पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाशी संबंधित कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली.
ही घटना मोशी येथील एका भोजनगृहात रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. अनिल मोरे भोजनगृहात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील चित्रफीत नोंदवणार्‍या यंत्रणांचे दृश्य ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, अनिल मोरे यांच्या निधनाची बातमी समजताच रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून, काहींनी तीव्र भूमिका घेतल्याचेही दिसून आले. प्राथमिक तपासात जुना वाद किंवा वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला असून, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

COMMENTS