Homeताज्या बातम्याबीड

तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान

अध्यात्म, तर्कशास्त्र, समाजप्रबोधन आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून समाजमनावर अधिराज्य गाजवणारे ह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना दैनिक लोकनेता

दारूच्या नशेत पोलिसांना खोटा कॉल; मद्यपीविरुद्ध गुन्हा
कुकडी-सीना कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडाआ. रोहित पवारांचा पाठपुरावा ;  प्रशासनाकडे मागणी
कुख्यात गुंड सचिन घायवळ राजस्थानातून अटकेतवेषांतर करूनही पोलिसांच्या जाळ्यात ; नऊ महिन्यांपासून फरार



अध्यात्म, तर्कशास्त्र, समाजप्रबोधन आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून समाजमनावर अधिराज्य गाजवणारे ह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना दैनिक लोकनेता वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 मध्ये प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व प्रसिद्ध अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
परळी वैजनाथ येथील हॉटेल भागवत पॅलेस येथे रविवारी (दि.10 मे 2026) आयोजित दिमाखदार राज्यस्तरीय सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये अध्यात्मिक व समाजोपयोगी कार्यामुळे राज्यभर विशेष ओळख निर्माण करणारे ह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजू महाराज लोखंडे यांचे प्राथमिक शिक्षण जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. बालपणापासूनच अध्यात्माची ओढ असलेल्या महाराजांनी पुढे एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पाटोदा येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी खेमानंद महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले. तसेच वैराग्यमूर्ती ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या संस्थेत काही काळ सेवा देत अध्यात्मिक साधनेत स्वतःला पूर्णतः समर्पित केले. ब्रह्मचारी वृत्तीने जीवन जगत असताना त्यांनी तर्कशास्त्रावर आधारित विलक्षण अभ्यास आत्मसात केला. कोणताही औपचारिक ज्योतिषशास्त्रीय अभ्यास नसतानाही केवळ तर्कशक्तीच्या आधारे व्यक्तींच्या जन्मतारखा, वार आणि आयुष्यातील संभाव्य घटनांचा अचूक अंदाज व्यक्त करण्याच्या त्यांच्या अनोख्या क्षमतेमुळे ते राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक राजकीय व सामाजिक घडामोडींवरील त्यांच्या भाकितांची अचूकता अनुभवास आली असून समाजात त्यांच्याविषयी विशेष आदर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नैराश्यात अडकलेल्या व्यक्तींना सकारात्मक जीवनदृष्टी देत आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त करण्याचे मोलाचे समाजकार्य ते सातत्याने करीत आहेत. अध्यात्मिक मार्गदर्शनासोबतच सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या उपक्रमांतून ते समाजात नवचैतन्य निर्माण करीत आहेत. त्यांच्या कार्यातून अनेकांना नवी प्रेरणा आणि जगण्याची दिशा मिळत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यापूर्वीही त्यांना समाजरत्न पुरस्कार 2025, लोकरत्न पुरस्कार 2026 तसेच गंगाई-बाबाजी समाजभूषण पुरस्कार 2025 यांसारखे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांच्या कार्याचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल आ. सुरेश धस, उद्योजक परमेश्वर शेठ येवले (इंदौर), शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश उगले, सतीश शेळके, संजय पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या सोहळ्यास परळी शहरचे पोलिस निरीक्षक श्री. नाचन, जी.व्ही.टी. संस्थापक मयंक गांधी, नायब तहसीलदार पठाण मॅडम, साहित्यिक नागेश शंकर शेलार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दैनिक लोकनेताचे मुख्य संपादक ज्ञानेश्वर भाऊसाहेब मुंढे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सहसंपादक अण्णासाहेब साबळे, निवासी संपादक प्रदीप मुंडे, उपसंपादक विजय रोडे, प्रतिनिधी हनुमंत गुट्टे व प्रविण फड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा हा राज्यस्तरीय सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय व प्रेरणादायी ठरला.

COMMENTS