शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मौजे चाकरवाडी येथे माऊली महाराज मंदिर पर

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मौजे चाकरवाडी येथे माऊली महाराज मंदिर परिसरात 12 मे रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक घटकांनी शासनाच्या विविध योजनांचा आणि सेवांचा लाभ घेतला.
राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू केले असून, नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी तसेच बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव हे विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन अभियानाची पाहणी करत आहेत. चाकरवाडी येथे आयोजित शिबिरातून या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, नायब तहसीलदार सुहास हजारे, प्रशांत जाधवर, संजय गांधी विभागाचे अण्णासाहेब वंजारे, सुरेंद्र डोके, संभाजी थोटे, मंडळ अधिकारी दीपाली आघाव मुंडे, सोनाली कदम, पुरुषोत्तम आंधळे, बाबासाहेब तांदळे, पंडित नाईकवाडे तसेच ग्राम महसूल अधिकारी प्रशांत नलावडे, प्रदीप गर्जे, निखिल राऊत आणि तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शिबिराचे महत्त्व व उद्देश स्पष्ट करत हे शिबिर सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमासाठी चाकरवाडीचे माजी पोलीस पाटील नानासाहेब काकडे पाटील, सरपंच विनोद कवडे, उपसरपंच महादेव अनवने, पांढर्याची वाडीचे सरपंच उमेश ताटे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत वाघमारे, हनुमंत चाळक, प्रशांत वाळके, अक्षय घोडके, धम्मदीप वंजारे, बाबासाहेब पवार, ज्ञानोबा अनवने आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. शिबिरात महसूल मंडळातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, महसूल कर्मचारी, महावितरण कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, विद्यार्थी, शेतकरी गट आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला लोकाभिमुख स्वरूप प्राप्त झाले. भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांची स्वतंत्र नोंद केली. शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. महसूल विभागाशी संबंधित जमीन नोंदणी, वारस नोंद, डिजिटल सातबारा उतारे, विविध दाखले व प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. शिबिरात जिवंत सातबारा, मयत खातेदार कमी करणे, वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतर, वारस फेरफार, पाणी नोंद, नोंदणी प्रक्रिया, वसुली पावत्या, सेवा मित्र प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, पानंद रस्ते योजना, रस्त्यांच्या नोंदी, केवायसी प्रक्रिया, आधार शिबिर, अभिलेख दुरुस्ती, घरकुल मंजुरी, गायरान मंजुरी आदेश तसेच शेततळे योजनांची माहिती देण्यात आली. याशिवाय डिजिटल सातबारा उतार्यांचे वाटप, विविध योजनांतील प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. प्रास्ताविक करताना मंडळ अधिकारी दीपाली आघाव यांनी सांगितले की, गावकर्यांपर्यंत जाऊन सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल. तसेच तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बीड येथे नियुक्तीनंतर अशा प्रकारच्या लोकाभिमुख उपक्रमांना सुरुवात केल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे समाधान शिबिर यशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

COMMENTS